नवीन लेख- बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
नमस्कार मित्रानो ! तुमच प्रेम पाहून अजून एक विचार मांडावा असा वाटला म्हणूनच नवीन लेख लिहित आहे
खर तर हा लेख माझ्यासाठी लिहिला आहे. मलाच याची गरज आहे. प्रयत्न चालू आहे . पण वाटला तुम्हाला पण share करावा. मुद्दाम मराठीतून तुमच्यासाठी
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको
मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसर्याचा ठेवा, करुनी हेवा, झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी होउनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको
विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा, भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको
दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको
आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको
सत्कीर्तिनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको
मित्रानो आठवतीये का ही कविता?
कदाचित जे मराठी माध्यमात शिकले असतील त्यानाच आठवत असेल
असो!
मला हल्ली नेहमी ही कविता आठवते आणि काहीतरी चुकते आहे असा भास होतो . (फक्त भास ......)
पण शाळेत असताना जेंव्हा ही कविता वाचली होती तेंव्हा मनात ठरवला होता असा माणूस व्हायच म्हणून.
तुमी पण ठरवल होत का ?
अर्थात तेंव्हा हे सगळा खूप सोपा वाटायच.
म्हणजे पहा ना , "बिकट वाट वहिवट नसावी धोपट मार्गी फिरू नको " या पहिल्याच ओळीत डाव फसला. आपण GAY असन म्हणजे धोपट मार्गच नाही का? सरळ गोष्ट सोडून इथे येयुन आपलीच फजिती करून घेतो
अर्थात हे माझे स्वताचे विचार आहेत. या विधानाला बरीच वळण येऊ शकतात.पण तसा विचार थोड्यावेळ करू नका
बर ते राहू दे. त्या पुढचे जे बोल आहेत ते आपण किती प्रमाणात आहोत?
पहा वाचून. आणि पटल तर घ्या .
एक गोष्ट मी accept करतो की तुम्हाला वाटेल या असल्या जगात हे सगळा कोण विचार करणार?
पण ते एक आत्मिक समाधान असत अस मला वाटत.
तुमची प्रतिक्रिया तुमच्या मनासमोर मांडा आणि पहा उत्तर काय मिळते ते :)आणि मला उत्तर कळवा.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ